मुंबई असो किंवा कोणतही ठिकाण प्रत्येक माणसाला मनोरंजनाची गरज ही असेच त्यामुळे धावपळीच्या आयुष्यात दोन घटका करमणूक होईल व थोडे खळाळून हसता येईल अशा प्रकारच्या मनोरंजनाची गरज सर्वानाच असते. याच उद्देशाने झी टॉकीज वाहिनी ‘न.स.ते. उद्योग’ हा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २९ ऑक्टोबरपासून दर रविवारी रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.‘न.स.ते. उद्योग’ कार्यक्रमात अभिनेते संजय नार्वेकर, नीलेश दिवेकर, शेखर फडके, नम्रता आवटे, पंकज पंचारिया, जनार्दन लवंगारे हे कलाकार आहेत. ‘नसते’ हे एका माणसाच्या नावाचे लघुरूप असून ‘नरसिंगराव सर्जेराव तेलेपाटील’ असे त्यांचे नाव आहे. ही भूमिका संजय नार्वेकर साकारत आहेत. नरसिंग हा एका खेडेगावातील शेतकरी पाटलाचा गडगंज श्रीमंत मुलगा आहे. या माणसाला स्वत:चा उद्योग करायचा आहे. त्यासाठी तो नानखटपटी करतो. पण यश काही येत नाही. पण हताश न होता तो पुन्हा जोमाने उभा राहून नवीन उद्योग करायला सज्ज होतो, असे संजय नार्वेकर यांनी सांगितले. झी मराठी वाहिनीवरील ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेतील ‘शिऱ्या’च्या भूमिकेतील कलाकार व सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेले विकास कदम यांनी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews